Friday, June 7, 2019

मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ ४


मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ ४

आतापर्यंत आपण ३० अक्षरे शिकलो  आजच्या पाठात आपण केवळ २ अक्षरांवरून तयार होणारी ५ अक्षरे शिकणार आहोत.




मोडी लिपी मुळाक्षर


मोडी  लिपीतिल एका "व" या अक्षरावरून आपण ५ अक्षरे लिहायला शिकणार आहोत

मोडी 'व' हे अक्षर लिहिण्यास अतिशय सोपे आहे . वळणाचे नीट निरीक्षण करा व सराव करा.

व या मोडी अक्षराला डाव्या बाजूस मध्यावर  गाठ दिली  की मोडी लिपीतिल "ब" हे अक्षर तयार होते .

मोडी व या अक्षराला डाव्या बाजूला शिरोरेघे जवळ एक पोकळ गाठ दिली की  मोडी चे "आ" हे अक्षर तयार होते .

व या मोडी अक्षरापासून तयार झालेल्या आ या अक्षरावर एक मात्रा दिल्यास "ओ" आणि दोन मात्रा दिल्यावर "औ"  ही अक्षरे तयार होतात.

 व आणि ब ही अक्षरे व्यंजने आहेत. तर आ, ओ, औ हे स्वर आहेत.


आकार :-



मोडी व आणि ब यांचे काने त्यांना जोडूनच आहेत . त्यांच्या वळनांचे नीट निरीक्षण करा व सराव करा. 


मोडी लिपी मुळाक्षर

मोडी लिपी मुळाक्षर


इकार :-

मागील पाठांत शिकल्याप्रमाणेच मोडी मुळ अक्षरांनाच वेलांटी जोडून -हस्व व दीर्घ  इकार काढले जातात.

मोडी लिपी मुळाक्षर


उकार  :-

मुळ मोडी अक्षरांनाच मोडी लिपीतिल तू हे अक्षर जोडून -हस्व व दीर्घ उकार काढले जातात.
मोडी लिपी मुळाक्षर
मोडी लिपी मुळाक्षर

एकार :-

मुळ मोडी लिपी अक्षरांवर देवनागरी प्रमाणेच डोक्यावर एक मात्रा देऊन एकार लिहिले जातात.
मोडी लिपी मुळाक्षर

मोडी लिपी मुळाक्षर



ऐकार :-


मुळ मोडी  अकारांती अक्षरांवर ५ चा आकडा काढून ऐकार लिहिले जातात.
मोडी लिपी मुळाक्षर



मोडी लिपी मुळाक्षर



ओकर :-


आकारांती मोडी अक्षरावर देवनागरी एक मात्रा देऊन ओकर लिहिले जातात.

मोडी लिपी मुळाक्षर


मोडी लिपी मुळाक्षर



औकार :-


आकारांती मोडी अक्षरांवर ५ चा आकडा देऊन औकार लिहिले जातात.
मोडी लिपी मुळाक्षर


मोडी लिपी मुळाक्षर


अनुस्वार :-


मुळ मोडी अक्षरांवर टिंब देऊन अनुस्वार लिहिले जातात, देवनागरी प्रमाणेच.

मोडी लिपी मुळाक्षर

मोडी लिपी मुळाक्षर


विसर्ग :-


मुळ मोडी अक्षरांपुढे  देवनागरी प्रमाणेच दोन टिंब देऊन विसर्ग देतात. 

मोडी लिपी मुळाक्षर

मोडी लिपी मुळाक्षर



वर शिकलेल्या अक्षरांच्या बारखड्या

मोडी लिपी बाराखडी

गृहपाठ :-

आज शिकलेल्या व आधीच्या पाठांत शिकलेल्या सर्व बरखड्या ५ वेळा लिहा . व आज शिकलेली अक्षरे वापरुन शब्द व वाक्य बनवा.  

Thursday, June 6, 2019

मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ ३


मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ ३



मागील २ पाठांत आपण एकूण २०  मोडी अक्षरे शिकलो.आज आणखी १० अक्षरांची माहिती करून घेऊ .आज आपण परस्परविरोधी किंवा थोड्या फार फरकाने बदलणारी अक्षरे पाहूया.

आज आपण पुढील १० अक्षरे पाहूया : -




मोडी लिपी मुळाक्षर


मोडी 'स' हे अक्षर ७ या अंकासारखे आहे .

तर 'य' हे अक्षर अगदी ७ च्या विरुद्ध आहे .

'म' हे अक्षर बालबोध   अक्षरासारखेच आहे . पण त्याचा काना देताना लिखणी वर न उचलता गाठ मारल्यासारखा लिहिला जातो .

मोडी लिपीतील 'फ' हे अक्षर प्रथम बालबोध प लिहून त्याला मोडी काना जोडून लिहिला जातो.

'झ' हे अक्षर बालबोध प्रमाणेच आहे .फक्त लेखणी न उचलता काना काढला आहे .

'प' हे अक्षर गणपतीच्या गंधासारखे आहे .

मोडी प या अक्षराला डाव्या बाजूला पोकळ गाठ दिली की मोडी 'थ' हे अक्षर तयार होते.

थोडया फार फरकाने  बदलणार्‍या अक्षरांपैकी 'क' हे अक्षर आहे  . अर्धवट मोडी लिपीतील ल हे अक्षर काढून त्याची उजवी बाजू वर शिरोरेघेला न चिकटवता उजव्या बाजूस खाली ओढली जाते . व तिथेच एक पुन्हा गाठ देऊन ती रेघ / काना वर शिरोरेघेला जोडले जाते .

टीप : - क च्या दोन्ही गाठी पोकळ किंवा भरीव काढल्या तरी चालतात.

आपल्या मराठीतला ४ चा अंक म्हणजेच मोडी लिपीतील 'ल' हे अक्षर होय .

'च' हे अक्षर मोडी लिपीतील दस्तऐवज वाचताना वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेले सापडले आहेत . त्यांच्या वळणांचे नीट निरीक्षण करून त्या प्रमाणे लिहिण्याचा सराव करा .

आकार :-


मोडी लिपी मुळाक्षर


'सा' हे अक्षर इंग्रजी अक्षर U सारखे लिहून त्यालाच लेखणी न उचलता काना काढला जातो व त्याच्या पोटात एक तिरपी रेघ ओढतात.  याचे नीट निरीक्षण करून परत परत सराव करा .

'या' हे अक्षर मोडी लिपीतिल म अक्षर अर्धे लिहून त्यालाच आणखी एक काना जोडला जातो .

'मा' या अक्षराचे नीट निरीक्षण करा. त्याच्या वळणावर लक्ष द्या . कारण दिसायला जरी सोपा दिसत असला तरी त्याचे लिहिताना थोडे जरी वळण चुकले तरी वाचणार्‍याला या अक्षरा संबंधित शब्द वाचणे कठीण जाते . वळण चुकल्यास तो मोडी अक्षर क आणि ला सारखा दिसू  शकतो .

'फा' हे अक्षर फ प्रमाणेच लिहिले जाते . फक्त त्यात आणखी एक काना लिहिला जातो . त्याचे नीट निरीक्षण करून लिहा .

'झा' हे अक्षर झ या मोडी लिपीतिल अक्षराप्रमाणेच आहे . त्याचे नीट निरीक्षण करून लिहा .

'पा' हे मोडी अक्षर देवनागरी लिपीतिल पा प्रमाणेच लिहिले जाते .

'था' हे मोडी अक्षर देवनागरीतिल था अक्षराप्रमाणेच लिहिले जाते .

'का' हे अक्षर मोडी लिपीतिल क सारखाच  लिहितात. फक्त त्यात आणखी एक काना जोडला जातो .

'ला' हे मोडी अक्षर दिसायला मोडी लिपीतिल क या अक्षराप्रमाणेच असते . परंतु क लिहितान त्याच्या दोन्ही गाठी पोकळ किंवा दोन्ही गाठी भरीव लिहितात .   पण ला ची पहिली गाठ पोकळ व दुसरी गाठ भरीवच दिली  पाहिजे .
'चा' या अक्षराचा काना स्वतंत्र आहे . मुळ मोडी च या अक्षराला काना जोडला आहे .


 इकार :-


मोडी लिपी मुळाक्षर

ली हे मोडी अक्षर वगळता बाकी सर्व अक्षरे मुळ मोडी अकारांती अक्षरांवर  वेलांटी काढून लिहितात. 


मोडी लिपी मुळाक्षर


काही दस्तैवजांमध्ये मुळ मोडी लिपी ल याच अक्षरावर वेलांटी दिलेली सुद्धा आढळते . खलील चित्रात दखवल्याप्रमाणे :-


बर्‍याचदा मुळ देवनागरी लिपीतिल ल याच अक्षरावर वेलांटी -ली असे लिहलेले देखील सापडले आहे .खलील चित्रात दखवल्याप्रमाणे :-

मोडी लिपी मुळाक्षर

वरील वळणांचे नीट निरीक्षण करा व सराव करा

उकार  :-




मोडी लिपी मुळाक्षर


'सु' हे मोडी अक्षर वेगळ्या पद्धतीने लिहिले जाते . बालबोध / देवनागरी 'य' हे अक्षर  अर्ध लिहून त्याला पुढे तु हे मोडी अक्षर जोडले जाते . 

मागील पाठांत आपण शिकलो की ' तू ' हे मोडी अक्षर जोडून मोडी लिपीतिल बरीच अक्षरे लिहिली जातात . त्याप्रमाणेच इथेही यु, झु, थु , लु , चु या मोडी मुळ अक्षरांना मोडी तु हे अक्षर जोडून उकार लिहिले जातात .

'मु' आणि 'पु' यांचे उकार बालबोध / देवनागरी प्रमाणेच आहेत . 
'
फु' हे मोडी अक्षर तु मोडी अक्षर जोडूनच पण  स्वतंत्र पद्धतीने लिहिले जाते. फ या मोडी अक्षराला तु हे मोडी अक्षर जोडलेले आहे . पण ते कशाप्रकारे जोडलेले आहे त्याचे नीट निरीक्षण करा व लिहिण्याचा सराव करा . 

'कु' हे मोडी अक्षर स्वतंत्र प्रकारेच लिहिले आहे . परंतु कु ची सुरुवातच मोडी तु अक्षरा ने होते . नीट निरीक्षण करून पुन्हा पुन्हा लिहिण्याचा सराव करा.


एकार :-


मोडी मुळ अकारांती अक्षरांवर एक मात्रा देऊन एकार लिहिले जातात .



मोडी लिपी मुळाक्षर



ऐकार :-


मोडी मुळ अक्षरांवर मात्रा देऊन ५ चा आकडा लिहून ऐकार लिहिले जातात.


मोडी लिपि मुळाक्षर


ओकार :-



मोडी आकारांती अक्षरांवर एक मात्रा देऊन ओकार लिहिले जातात.


मोडी लिपी मुळाक्षर

औकार :-


मोडी आकारांती अक्षरांवर ५ चा आकडा मात्रे प्रमाणे देऊन औकार लिहितात.


मोडी लिपी मुळाक्षर


अनुस्वार :-


मोडी अकारांती मुळ अक्षरांवर टिंब देऊन अनुस्वार लिहिले जातात.

मोडी लिपी मुळाक्षर 


विसर्ग :-


मोडी मुळाक्षरा पुढे दोन टिंब देऊन विसर्ग लिहितात . 

मोडी लिपी मुळाक्षर

वर शिकलेल्या अक्षरांच्या बाराखड्या :-

मोडी लिपी मुळाक्षर

वाचा,  लिहा आणि सराव करा  :-

मोडी लिपी शब्द

विशेष लक्षात ठेवण्यासारखी अक्षरे :-

मोडी लिपी अक्षरे

गृहपाठ :-

आतापर्यंत शिकलेल्या अक्षरांच्या बरखड्या ५ वेळा लिहा .
तसेच बरखाड्यांवर आधारित अक्षरांवर १० शब्द  आणि १० वाक्य लिहा .


टीप :-

मोडी अक्षर लेखनात बर्‍याच अंशी साम्य असल्यामुळे मोडी "क" आणि "ला" हा भेद संदर्भानेच ओळखावा लागतो.
तसेच मोडी लिपीत विराम चिन्हे , शब्द फोड किंवा शब्द तोड हे नियम नसल्यामुळे  जिथ पर्यन्त ओळ आहे तिथ पर्यन्त लिहीत जाण्याच्या पद्धतीमुळे शब्द किंवा वाक्याची तोड अथवा वेगळे कुठे करावे हे संदर्भ पाहून लिप्यंतर करणे आवश्यक असते . नाहीतर वाक्य अथवा शब्द चुकीचे वाचले जाऊ शकते . 

मोडी वाचताना वाचकाला संदर्भाने व तरतम्याने वाचावे लागते . 



मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ २ शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा  :-

https://modeelipi.blogspot.com/2019/04/modi-lipi-mulakshara-basic-alphabets-lesson2-barakhadi.html

Monday, April 22, 2019

मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ २

मोडी लिपी  प्राथमिक अभ्यास पाठ २ 


मागिल पाठ क्रमांक १ मध्ये आपण बालबोध लिपी प्रमाणेच लिहिल्या जाणार्‍या १० मोडी अक्षरांचा अभ्यास केला .
आजच्या पाठात आपण पुढील १० अक्षरांचा अभ्यास करणार आहोत .
ही १०अक्षरे केवळ ४ अक्षरांतून थोडासा फरक करून होतात.


मोडी लिपी मुळाक्षर

वरील मुळाक्षरे पाहूया 

येथे मोडी ' ह ' या अक्षराच्या डोक्यावर एक रफार दिला की मोडी ' ई ' हे अक्षर तयार होते.

' ह ' सारखेच दिसणारे ' द ' हे मोडी अक्षर खालच्या बाजूने जरा जास्त गोलाकार लिहितात.

मोडी द च्या आतल्या बाजूला पोकळ गाठ दिली की ' ध ' हे अक्षर तयार होते. 

याच मोडी द च्या शिरोरेघेच्या वर एक पोकळ गाठ दिली की मोडी  ' ख ' हे अक्षर तयार होते .

अशा प्रकारे या एका मोडी लिपी अक्षरावरून ३ वेगळी अक्षरे तयार होतात.


' र ' हे मोडी अक्षर छत्रीच्या दांड्याच्या मुठी सारखे वळणदार असते. 

मोडी र या अक्षराला छत्रीच्या दांड्याची मूठ आणखी थोडी आतून वळण देऊन काढली की मोडी ' ट '
हे अक्षर तयार होते.

याच मोडी च्या छत्रीच्या दांड्याच्या मुठीत एक टिंब दिला की ' ठ ' हे अक्षर तयार होते

मोडी ' ज ' लिहिताना या अंकाला एक पोकळ गाठ दिली की झाले .

याच मोडी या अक्षराला एक भरीव गाठ दिली की मोडी ' न ' अक्षर  तयार होते.

म्हणजेच आपण मोडी लिपीतीलया अक्षरावरून लिहितो.

या अक्षरावरून आणि लिहितो.

वरून आणि   लिहितो.

तर वरून लिहितो.


आकार 


मोडी लिपी मुळाक्षर

६ या अंकला गाठ न देता लिहून त्याला मोडी लिपीतील हे मुळाक्षर जोडल्यास " हा " अक्षर तयार होते .

६ या अंकला गाठ न देता लिहा आणि त्याला एक मात्रा द्या की झाले तयार " दा " अक्षर.

मोडी " धा  " अक्षर बालबोध प्रमाणेच लिहितात परंतू ते लिहिताना शीघ्र लिपीत लिहितात.

मोडी " खा  " अक्षर चार चा आकडा थोडासा तिरका जोडून लिहितात  .

" रा " हे अक्षर लिहिताना उभ्या रेषेच्या डाव्या भागी एक छोटी आडवी रेघ मध्यभागी देतात . आणि आणखी एक काना देतात.

मोडी अक्षरे दा , धा , आणि रा यांना काने सुटे देतात.

टा , ठा , जा , ना यांचे काने मात्र त्यांना जोडूनच आहेत. त्यांच्या वळंनांचे नीट निरक्षण करा व सराव करा.


इकार

मोडी लिपी मुळाक्षर


 मागिल पाठात शिकवल्याप्रमाणेच या ही मोडी मुळाक्षरांना वेलांटी जोडून इकार काढले जातात.

उकार


मोडी लिपी मुळाक्षर



मागिल पाठातील तू मोडी लिपी अक्षर वापरुन " हु " लिहिला जातो . तु लिहिताना सुरुवात  वरच्या बाजूस शेंडी वाढवून केली की हु मोडी अक्षर तयार होते. 

" दु " हे  अक्षर स्वतंत्र , वेगळ्या पद्धतीने लिहिले जाते . त्या वळणाचे नीट निरीक्षण करून सराव करा.

" ध" या मोडी लिपीतील मुळाक्षरास मोडी लिपीतील तु अक्षर जोडून लिहिल्यास ' धु ' मोडी अक्षर बनते.

" खु " अक्षर मोडी लिपीतील तु या अक्षरावरूनच तयार झाले आहे . तु च्या पोटात एक आडवी रेघ दिली की मोडी लिपीतील खु अक्षर बनते. 

" रु " हे  अक्षर स्वतंत्र , वेगळ्या पद्धतीने लिहिले जाते . त्या वळणाचे नीट निरीक्षण करून सराव करा.

" टु " आणि " ठु " या मोडी अक्षरांना बालबोध प्रमाणेच उकार दिलेले आहेत.

" जु ",  " नु " हे  अक्षर स्वतंत्र , वेगळ्या पद्धतीने लिहिले जाते . रु या मोडी शब्दा प्रमाणेच उकारची पद्धत वापरली जाते.  त्या वळणाचे नीट निरीक्षण करून सराव करा.

एकार

मोडी लिपी मुळाक्षर


मुळ मोडी लिपी अक्षरांना बालबोध प्रमाणेच डोक्यावर मात्रा देऊन एकार लिहिले जातात.



ऐकार

मोडी लिपी मुळाक्षर

मुळ मोडी लिपीतील मुळाक्षरांना बालबोध प्रमाणेच पण २ मात्रा न देता ५ चा आकडा लिहितात.



ओकार


मोडी लिपी मुळाक्षर


आकारांती मोडी अक्षरांवर बालबोध प्रमाणेच मात्रा देतात.


औकार


मोडी लिपी मुळाक्षर

आकारांती मोडी अक्षरांवर ५ चा आकडा काढून लिहितात .



अनुस्वार



मोडी लिपी मुळाक्षर


मुळ मोडी लिपीतील अक्षरांवर अनुस्वार देतात.



विसर्ग


मोडी लिपी मुळाक्षर


मुळ मोडी लिपीतील अक्षरांपुढे २ टिंब देऊन बालबोध प्रमाणेच विसर्ग काढतात.


वर शिकलेल्या अक्षरांच्या बाराखड्या खालीलप्रमाणे आहेत :-

मोडी लिपि मुळाक्षर बाराखडी

यांचा सराव पुन्हा पुन्हा लिहून करा म्हणजे लिपी लक्षात राहण्यास सोपी जाईल . जितका सराव लिहिण्याचा कराल तितके अक्षर सुधारण्यास मदत मिळेल व मोडी दस्त ऐवज वाचण्यास सोपे जाईल .


खालील शब्दांचा सराव करा वाचण्याचा व परत मोडी लिपीत लिहा




विशेष लक्षात ठेवण्यसारखी अक्षरे




गृहपाठ :-


आज शिकलेल्या दहा अक्षरांचा व त्यांच्या बाराखड्यांशी संबंधित दहा शब्द व पाच वाक्य तयार करा .



मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ १ शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:-

https://modeelipi.blogspot.com/2019/02/modi-lipi-mulakshar-basic-alphabets-lesson-barakhadi.html


मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ ३ शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :-

https://modeelipi.blogspot.com/2019/06/modi-lipi-mulakshare-basic-alphabets-barakhadi.html

Friday, February 15, 2019

मोडी लिपी इतिहास

मोडी लिपी इतिहास 


सदर लेख मागे २६ जानेवारी २०१९ रोजी लिहिलेला होता, परंतु काही जणांना सदर लेखाची लिंक उघडल्यावर पोस्ट दिसत नाही असे ईमेल मला आले म्हणून " मोडी लिपी इतिहास " हा लेख पुन्हा पोस्ट करत आहे.ब्लॉग ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद . व आपल्या प्रतिक्रिया अश्याच माझा पर्यन्त पोहोचू देत. 


मागच्या लेखात आपण मोडीचा उगम कसा झाला पहिले. मोडीच्या निर्मितीची आवश्यकता का लागली ? हे पाहिले . व पुढे ती कशी विकसित झाली व इतिहासाच्या पानांवर आपले असतीत्व उमटवले हे पाहिले .

आजच्या लेखात आपण काळानुसार मोडी टप्या-टप्या ने कशी व्यवहारात आली हे वाचूया.

काळानुसार मोडी लिपीचे विभाग पुढील प्रमाणे पाडता येतील  :-

 आद्यकाळ 
 यादवकाळ 
 बहामनीकाळ 
४  शिवकाळ
५  पेशवेकाळ
आङ्ग्लकाळ 


१  आद्यकाळ  :-


हा काळ इ. स. १२०० पूर्व म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या लिखाणाच्याही पूर्वीचा काळ होय .

इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मते , ज्ञानेश्वरी हा ग्रंथ शके १२१२ (इ.स . १२९०) मध्ये लिहिला गेला. व हेमाद्री पंत हे इ.स .१२६० पासून देवगिरीच्या यादवांचे दफ्तरदार होते .

ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी च्या १३ व्या अध्यायात मोडी लिपीचा अप्रत्यक्ष रीतीने उल्लेख केला आहे तो पुढील प्रमाणे :-

"हे बहू असो. पंडितू  धरुनू बालकाचा हातू 
वोळा लेहेले वेगवन्तू आपणची l "

या ओवीतील " वेगवन्तू " हा शब्द राजवाडे यांना महत्वाचा वाटतो . बालबोध / देवनागरी अक्षर वेगाने लिहिता येतं नाही त्यामुळे देवनागरी लिपिला उद्देशून  " वेगवन्तू " ( वेगवंत ) हा शब्द योजला असावा असे त्यांना वाटत नाही . त्यांच्या मते मोडी अक्षरांच्या संबंधाने तो महाराजांनी योजला असावा . हा  " वेगवन्तू " शब्द ते मोडी ची साक्ष म्हणून सांगतात.यावरून त्यांनी ज्ञानेश्वरी पूर्वी मोडी होती असे अनुमान काढले .





तसेच खालील उल्लेखांवरून ही मोडी ज्ञानेश्वरी पूर्वी अस्तित्वात होती हे सिद्ध होते 
२  " सुखाची लिपी पुसिली ll " ज्ञानेश्वरी अध्याय ३ ओवी क्र ३४६ 
" दोषांची लिहिली फाडी ll " ज्ञानेश्वरी अध्याय ४ ओवी क्र ५२ 

४  " आखरे पुसलीया ना पुसे , अर्थ जैसा ll " ज्ञानेश्वरी अध्याय ८ ओवी क्र १७४   

ज्ञानेश्वर महाराज व हेमाद्री पंत हे समकालीन होते. यावरुन हेमाडपंतांच्या पूर्वीही मोडी लिपी अस्तित्वात होती हे सिद्ध होते.


२  यादवकाळ  :-  


इ.स. १२०० ते १३५० या काळात देवगिरीचे यादव महाराष्ट्रावर राज्य करीत होते. व यांच्या काळात मराठी भाषेला राज भाषेचा दर्जा होता.


दक्षिण हिंदुस्तानात यादवांचे  साम्राज्य असताना,महादेवराव  यादवांच्या कारकिर्दीत हेमाडपंत ( इ.स.१२६० श. ११८२ ) प्रख्यात महामंत्री होते व याच काळात त्यांनी राजकीय व खाजगी कागदपत्र लिहिण्याचे कामी मोडी लिपी नव्याने प्रचारात आणली.

या काळात लेखनासाठी बोरूचा वापर करीत असत. बोरू म्हणजे ७-८ इंच लांब बांबूच्या तुकड्याच्या टोकाला तिरपा छेद देऊन तिची लेखणी तयार करीत असत. बोरूने लेखन करताना तो सारखा सारखा प्रत्येक अक्षर लिहिताना दौतीत बुडवावा लागत असे त्यामुळे अक्षर मोठी ,स्पष्ट दिसत असल्यामुळे वाचायला सोपे वाटायचे .


बहामनीकाळ  :--

हा काळ इ.स. १३५० ते १६०० असा आहे यादवांचे स्वराज्य संपून मुसलमानी आक्रमकांचा काळ सुरू झाला. हिंदुस्थानातील पहिली शिया मुस्लिम राजवट म्हणजे बहमनशाही. त्यांना स्थानिक लोक व भाषेशी काही कर्तव्य नव्हते.सरकारी भाषा फारसी  झाल्याने , मराठी भाषेत फारसी शब्दांचे आगमन झाले . लिखाणासाठी कागदाचा वापर हा मुस्लिमांनी भारतात सुरू केला असावा कारण " कागज " हा फारसी शब्द असून कागज या अर्थाचा संस्कृत शब्द अस्तित्वात नाही .

बहामनी  राज्याची ५ शके :- 
१  अहमदनगरची निजामशाही  १४९६  -१६३७
२  विजापूरची आदिलशाही   १४९० - १६८०
३  बिदरची बरीदशाही  १५०४ - १६१९
४  गोवळकांडयाची कुतूबशाही  १५४३ - १६८७
५  वर्‍हाडाची इमादशाही  १५१० -१५७४

या काळातील साहित्य जुन्या हस्तलिखितांतून अवतीर्ण झाले असून मुळ ग्रंथकर्त्याची हस्थालिखिते उपलब्ध होत नाहीत. त्यांच्या उत्तरकालीन प्रतीच उपलब्ध होतात. त्यामुळे मूळग्रंथाचे स्वरूप कसे होते याची कल्पना येत नाही.


३  शिवकालीन :- 

इ.स. १६०० ते १७०० या काळात मराठी स्वराज्याची स्थापना झाल्याने फारसी शब्दांचे आक्रमण थंडावले .याच काळात शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांस राजव्यवहार कोश बनवताना फारसी ऐवजी संस्कृत शब्द योजना करण्यास सांगितले व रघुनाथ पंडितांनी तंजावरच्या धुंडीराज व्यास यांच्या कडून लिहून घेतला .


या काळात लेखनातून बोरूचा वापर कमी होऊन त्या जागी टाकाने लिहिणे सुरू झाले. टाकाच्या निफामध्ये जास्त शाई घेतली जात असल्याने लेखनाचा वेग वाढला. पण टाकाने लिहिलेला मजकूर अधिक लपेटीदार आकाराने लहान व वाचनास क्लिष्ट वाटू लागला. त्यात अनेक शब्द संक्षेप वापरले जाऊ लागले. शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांनी यात बर्‍याच सुधारणा करून लेखनाचा वेग वाढविला. मात्र त्यांत अरबी - फारसी भाषेतील शब्द येऊ लागल्याने वाचनास थोडे कठीण होऊ लागले





४  पेशवेकाळ   :- 


१७०० ते १८१८ मोडी लिपी पेशवे काळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती असे दिसून येते. पेशव्यांच्या दाप्तरातील कागदपत्रे , दस्तऐवज बघूनच त्यांच्या उत्कर्षाची कल्पना येते.पेशवाईतील टाकाने लिहिलेले अक्षर अत्यंत घोटीव , लपेटीदार , सुवाच्य ,सुबक अक्षर , दोन ओळीतील समान अंतर , काटेकोर शुद्धलेखन , ऐटबाज आणि वाचनीय असे होते.   पेशवे काळातील लिखाण बोरूने होत असे.




वळणाच्या दृष्टीने चिटणीसी , महादेवपंती , बिवलकरि आणि रानडी वळण असे प्रकार आढळून आले आहेत . या काळांत सर्व पत्र व्यवहार , राजकारण समाजव्यवस्था, न्यायनिवडा , हुकूम , सनद , राजकीर्द वगैरे सर्व मोडीतच लिहीत.  त्याच वेळी इंग्रजांचा पसारा हळूहळू वाढल्याने इंग्रजी शब्दांचा भरणा मोडीत असल्याने अपभ्रष्ट रूपांचा मजकूर वाचानास अतिशय कठीण समजला जाऊ लागला .



५  आङ्ग्लकालीन  :-  

इ.स. १८१८ ते १८७४ या इंग्रजी अमलान्त काही काळ मोडी व इंग्रजी असे जोडून लिखाण होत असे लेखनासाठी  शाईने भरलेल्या फाऊंटन पेन चा वापर होऊ लागला . फाऊंटन पेनचा एकच फायदा होता तो म्हणजे त्यात शाई बराच वेळ टिकून राहायची . पण अक्षर बोरू इतके सुंदर नसायचे .  इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे मोडीत अनेक इंग्रजी शब्द येऊ लागले त्यामुळे वाचन दुर्बोध होत गेले.  राजकारभारात मोडी चा वापर कमी होऊ लागला . उचभ्रु , सुशिक्षित लोकं आपले लिखाण मोडी ऐवजी इंग्रजीत करणे प्रतिष्ठेचे मानू लागले. व हळूहळू मोडी लिपी अस्त होऊ लागली .


मोडी व्यवहारात ठेवावी अथवा न ठेवावी यावर बरीच चर्चा १९१८ ( श. १८४० ) च्या सुमारास महाराष्ट्रात चालू होती ४-५ वेळा रद्दही करण्यात आली पण बरीच रदबदली करून कायदे कौन्सिलात तसा ठराव पास होऊनही मोडी लिपीला पुन्हा राजमान्यता प्राप्त झाली .

सन १९५२ नंतर शालेय पाठ्यक्रमातून मोडी लिपी वगळण्यात आली . काही काळ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोडी अभ्यासक्रमात होती . मात्र हळूहळू मोडी हा विषय ऐच्छिक ठेवण्यात आला . ट्रेनिंग , कॉलेज मधील विध्यर्थ्यांना  मोडीत निबंध लिहावा लागत असे .

पुढे  इ. १९५९(श . १८८१ ) रोजी मंत्री मंडळाने मोडी लिपीला अनावश्यक ठरवून ती पूर्णपणे शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकली व त्यामुळेच आजच्या पिढीला मोडी लिपी संदर्भात कोणतीही जाणीव नसणे हे स्वाभाविक आहे .