मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ २
मागिल पाठ क्रमांक १ मध्ये आपण बालबोध लिपी प्रमाणेच लिहिल्या जाणार्या १० मोडी अक्षरांचा अभ्यास केला .
आजच्या पाठात आपण पुढील १० अक्षरांचा अभ्यास करणार आहोत .
ही १०अक्षरे केवळ ४ अक्षरांतून थोडासा फरक करून होतात.
मोडी लिपी मुळाक्षर |
वरील मुळाक्षरे पाहूया
येथे मोडी ' ह ' या अक्षराच्या डोक्यावर एक रफार दिला की मोडी ' ई ' हे अक्षर तयार होते.
' ह ' सारखेच दिसणारे ' द ' हे मोडी अक्षर खालच्या बाजूने जरा जास्त गोलाकार लिहितात.
मोडी द च्या आतल्या बाजूला पोकळ गाठ दिली की ' ध ' हे अक्षर तयार होते.
याच मोडी द च्या शिरोरेघेच्या वर एक पोकळ गाठ दिली की मोडी ' ख ' हे अक्षर तयार होते .
अशा प्रकारे द या एका मोडी लिपी अक्षरावरून ३ वेगळी अक्षरे तयार होतात.
' र ' हे मोडी अक्षर छत्रीच्या दांड्याच्या मुठी सारखे वळणदार असते.
मोडी र या अक्षराला छत्रीच्या दांड्याची मूठ आणखी थोडी आतून वळण देऊन काढली की मोडी ' ट '
हे अक्षर तयार होते.
याच मोडी ट च्या छत्रीच्या दांड्याच्या मुठीत एक टिंब दिला की ' ठ ' हे अक्षर तयार होते
मोडी ' ज ' लिहिताना ४ या अंकाला एक पोकळ गाठ दिली की झाले .
याच मोडी ज या अक्षराला एक भरीव गाठ दिली की मोडी ' न ' अक्षर तयार होते.
म्हणजेच आपण मोडी लिपीतील ह या अक्षरावरून ई लिहितो.
द या अक्षरावरून ध आणि ख लिहितो.
र वरून ट आणि ठ लिहितो.
तर ज वरून न लिहितो.
आकार
मोडी लिपी मुळाक्षर |
६ या अंकला गाठ न देता लिहून त्याला मोडी लिपीतील र हे मुळाक्षर जोडल्यास " हा " अक्षर तयार होते .
६ या अंकला गाठ न देता लिहा आणि त्याला एक मात्रा द्या की झाले तयार " दा " अक्षर.
मोडी " धा " अक्षर बालबोध प्रमाणेच लिहितात परंतू ते लिहिताना शीघ्र लिपीत लिहितात.
मोडी " खा " अक्षर चार चा आकडा थोडासा तिरका जोडून लिहितात .
" रा " हे अक्षर लिहिताना उभ्या रेषेच्या डाव्या भागी एक छोटी आडवी रेघ मध्यभागी देतात . आणि आणखी एक काना देतात.
मोडी अक्षरे दा , धा , आणि रा यांना काने सुटे देतात.
टा , ठा , जा , ना यांचे काने मात्र त्यांना जोडूनच आहेत. त्यांच्या वळंनांचे नीट निरक्षण करा व सराव करा.
इकार
मोडी लिपी मुळाक्षर |
मागिल पाठात शिकवल्याप्रमाणेच या ही मोडी मुळाक्षरांना वेलांटी जोडून इकार काढले जातात.
उकार
मोडी लिपी मुळाक्षर |
मागिल पाठातील तू मोडी लिपी अक्षर वापरुन " हु " लिहिला जातो . तु लिहिताना सुरुवात वरच्या बाजूस शेंडी वाढवून केली की हु मोडी अक्षर तयार होते.
" दु " हे अक्षर स्वतंत्र , वेगळ्या पद्धतीने लिहिले जाते . त्या वळणाचे नीट निरीक्षण करून सराव करा.
" ध" या मोडी लिपीतील मुळाक्षरास मोडी लिपीतील तु अक्षर जोडून लिहिल्यास ' धु ' मोडी अक्षर बनते.
" खु " अक्षर मोडी लिपीतील तु या अक्षरावरूनच तयार झाले आहे . तु च्या पोटात एक आडवी रेघ दिली की मोडी लिपीतील खु अक्षर बनते.
" रु " हे अक्षर स्वतंत्र , वेगळ्या पद्धतीने लिहिले जाते . त्या वळणाचे नीट निरीक्षण करून सराव करा.
" टु " आणि " ठु " या मोडी अक्षरांना बालबोध प्रमाणेच उकार दिलेले आहेत.
" जु ", " नु " हे अक्षर स्वतंत्र , वेगळ्या पद्धतीने लिहिले जाते . रु या मोडी शब्दा प्रमाणेच उकारची पद्धत वापरली जाते. त्या वळणाचे नीट निरीक्षण करून सराव करा.
एकार
मोडी लिपी मुळाक्षर |
मुळ मोडी लिपी अक्षरांना बालबोध प्रमाणेच डोक्यावर मात्रा देऊन एकार लिहिले जातात.
ऐकार
मोडी लिपी मुळाक्षर |
ओकार
मोडी लिपी मुळाक्षर |
आकारांती मोडी अक्षरांवर बालबोध प्रमाणेच मात्रा देतात.
औकार
मोडी लिपी मुळाक्षर |
आकारांती मोडी अक्षरांवर ५ चा आकडा काढून लिहितात .
अनुस्वार
मोडी लिपी मुळाक्षर |
मुळ मोडी लिपीतील अक्षरांवर अनुस्वार देतात.
विसर्ग
मोडी लिपी मुळाक्षर |
मुळ मोडी लिपीतील अक्षरांपुढे २ टिंब देऊन बालबोध प्रमाणेच विसर्ग काढतात.
वर शिकलेल्या अक्षरांच्या बाराखड्या खालीलप्रमाणे आहेत :-
मोडी लिपि मुळाक्षर बाराखडी |
यांचा सराव पुन्हा पुन्हा लिहून करा म्हणजे लिपी लक्षात राहण्यास सोपी जाईल . जितका सराव लिहिण्याचा कराल तितके अक्षर सुधारण्यास मदत मिळेल व मोडी दस्त ऐवज वाचण्यास सोपे जाईल .
खालील शब्दांचा सराव करा वाचण्याचा व परत मोडी लिपीत लिहा
विशेष लक्षात ठेवण्यसारखी अक्षरे
गृहपाठ :-
आज शिकलेल्या दहा अक्षरांचा व त्यांच्या बाराखड्यांशी संबंधित दहा शब्द व पाच वाक्य तयार करा .
मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ १ शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:-
https://modeelipi.blogspot.com/2019/02/modi-lipi-mulakshar-basic-alphabets-lesson-barakhadi.html
मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ ३ शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :-
https://modeelipi.blogspot.com/2019/06/modi-lipi-mulakshare-basic-alphabets-barakhadi.html
मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ १ शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:-
https://modeelipi.blogspot.com/2019/02/modi-lipi-mulakshar-basic-alphabets-lesson-barakhadi.html
मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ ३ शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :-
https://modeelipi.blogspot.com/2019/06/modi-lipi-mulakshare-basic-alphabets-barakhadi.html