About Me

नमस्कार

मी कविता भोसले

मी महाराष्ट्र शासन प्रमाणित मोडी लिप्यंतरकार ( Transcriptor ) आहे.

मोडी लिपी मधे लिहिलेले शिवकालीन, पेशवेकालीन, आङ्ग्लकालीन तसेच अर्वाचीन काळातील दस्तऐवज लिप्यंतर करण्याचे ज्ञान मला अवगत आहे .

 modeelipi.blogspot.com हा ब्लाँग मी बनवला आहे . या ब्लाँगवर तुम्हाला मोडी लिपी शिकायला मिळेल , तसेच मोडी लिपी विषयी उपयूक्त माहिती वाचायला मिळेल.
मी स्वत: मोडी लिपीचा अभ्यास माझे महाविद्यालयातील बी.ए.  (संस्कृत) चे शिक्षण २००० साली घेत असताना सुरू झाला. तो आज पर्यंत सुरूच आहे. मी मोडी लिपी प्राथमिक ते प्रगत (Basic to advance course ) लेखन ते वाचनाचे प्रशिक्षण देते.

आङ्ग्लकालीन ( British East India company ) लिहिलेले  , इनाम , बक्षीसपत्र , गहाणपत्र, दानपत्र , वाटणीपत्र , खरेदीखत, विक्रीखत , पावत्या , भागीपत्र , इत्यादी ., अनेक तसेच घरगुती पत्रे  तसेच खाजगी पत्रे यांचे लिप्यंतर करून मी स्वतः दिलेले आहेत .

तुम्हाला मोडी लिपी प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन शिकायची असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता.
तुम्हाला देखील तुमच्याकडील मोडी लिपीतील दस्तऐवजांचे लिप्यंतर करून घ्यायचे असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकता .


संपर्क : कविता भोसले 
मोबाइल : 7506257973
ईमेल :       kavita.bhosale81@gmail.com
City : Mumbai
State :        Maharashtra
Nation :         India



विशेष सूचना :-

दस्तऐवजांची संख्या जास्त असल्यास प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन लिप्यंतर करून देता येऊ शकते . पण मुंबई बाहेर इतर कुठलेही ठिकाणी असल्यास मी स्वतः जात नाही परंतु यासाठी मी आपल्याला या विषयातील तज्ञ मंडळी उपलब्ध करून देऊ शकते. 
 

2 comments:

  1. शिवकाळामध्ये इनाम करीता कोणता शब्दप्रयोग केल्या जात होता कृपया सांगावे

    ReplyDelete
  2. क ख ग अशी मोडी लिपीतील अक्षर ओळख करून देणे

    ReplyDelete