Thursday, June 6, 2019

मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ ३


मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ ३



मागील २ पाठांत आपण एकूण २०  मोडी अक्षरे शिकलो.आज आणखी १० अक्षरांची माहिती करून घेऊ .आज आपण परस्परविरोधी किंवा थोड्या फार फरकाने बदलणारी अक्षरे पाहूया.

आज आपण पुढील १० अक्षरे पाहूया : -




मोडी लिपी मुळाक्षर


मोडी 'स' हे अक्षर ७ या अंकासारखे आहे .

तर 'य' हे अक्षर अगदी ७ च्या विरुद्ध आहे .

'म' हे अक्षर बालबोध   अक्षरासारखेच आहे . पण त्याचा काना देताना लिखणी वर न उचलता गाठ मारल्यासारखा लिहिला जातो .

मोडी लिपीतील 'फ' हे अक्षर प्रथम बालबोध प लिहून त्याला मोडी काना जोडून लिहिला जातो.

'झ' हे अक्षर बालबोध प्रमाणेच आहे .फक्त लेखणी न उचलता काना काढला आहे .

'प' हे अक्षर गणपतीच्या गंधासारखे आहे .

मोडी प या अक्षराला डाव्या बाजूला पोकळ गाठ दिली की मोडी 'थ' हे अक्षर तयार होते.

थोडया फार फरकाने  बदलणार्‍या अक्षरांपैकी 'क' हे अक्षर आहे  . अर्धवट मोडी लिपीतील ल हे अक्षर काढून त्याची उजवी बाजू वर शिरोरेघेला न चिकटवता उजव्या बाजूस खाली ओढली जाते . व तिथेच एक पुन्हा गाठ देऊन ती रेघ / काना वर शिरोरेघेला जोडले जाते .

टीप : - क च्या दोन्ही गाठी पोकळ किंवा भरीव काढल्या तरी चालतात.

आपल्या मराठीतला ४ चा अंक म्हणजेच मोडी लिपीतील 'ल' हे अक्षर होय .

'च' हे अक्षर मोडी लिपीतील दस्तऐवज वाचताना वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेले सापडले आहेत . त्यांच्या वळणांचे नीट निरीक्षण करून त्या प्रमाणे लिहिण्याचा सराव करा .

आकार :-


मोडी लिपी मुळाक्षर


'सा' हे अक्षर इंग्रजी अक्षर U सारखे लिहून त्यालाच लेखणी न उचलता काना काढला जातो व त्याच्या पोटात एक तिरपी रेघ ओढतात.  याचे नीट निरीक्षण करून परत परत सराव करा .

'या' हे अक्षर मोडी लिपीतिल म अक्षर अर्धे लिहून त्यालाच आणखी एक काना जोडला जातो .

'मा' या अक्षराचे नीट निरीक्षण करा. त्याच्या वळणावर लक्ष द्या . कारण दिसायला जरी सोपा दिसत असला तरी त्याचे लिहिताना थोडे जरी वळण चुकले तरी वाचणार्‍याला या अक्षरा संबंधित शब्द वाचणे कठीण जाते . वळण चुकल्यास तो मोडी अक्षर क आणि ला सारखा दिसू  शकतो .

'फा' हे अक्षर फ प्रमाणेच लिहिले जाते . फक्त त्यात आणखी एक काना लिहिला जातो . त्याचे नीट निरीक्षण करून लिहा .

'झा' हे अक्षर झ या मोडी लिपीतिल अक्षराप्रमाणेच आहे . त्याचे नीट निरीक्षण करून लिहा .

'पा' हे मोडी अक्षर देवनागरी लिपीतिल पा प्रमाणेच लिहिले जाते .

'था' हे मोडी अक्षर देवनागरीतिल था अक्षराप्रमाणेच लिहिले जाते .

'का' हे अक्षर मोडी लिपीतिल क सारखाच  लिहितात. फक्त त्यात आणखी एक काना जोडला जातो .

'ला' हे मोडी अक्षर दिसायला मोडी लिपीतिल क या अक्षराप्रमाणेच असते . परंतु क लिहितान त्याच्या दोन्ही गाठी पोकळ किंवा दोन्ही गाठी भरीव लिहितात .   पण ला ची पहिली गाठ पोकळ व दुसरी गाठ भरीवच दिली  पाहिजे .
'चा' या अक्षराचा काना स्वतंत्र आहे . मुळ मोडी च या अक्षराला काना जोडला आहे .


 इकार :-


मोडी लिपी मुळाक्षर

ली हे मोडी अक्षर वगळता बाकी सर्व अक्षरे मुळ मोडी अकारांती अक्षरांवर  वेलांटी काढून लिहितात. 


मोडी लिपी मुळाक्षर


काही दस्तैवजांमध्ये मुळ मोडी लिपी ल याच अक्षरावर वेलांटी दिलेली सुद्धा आढळते . खलील चित्रात दखवल्याप्रमाणे :-


बर्‍याचदा मुळ देवनागरी लिपीतिल ल याच अक्षरावर वेलांटी -ली असे लिहलेले देखील सापडले आहे .खलील चित्रात दखवल्याप्रमाणे :-

मोडी लिपी मुळाक्षर

वरील वळणांचे नीट निरीक्षण करा व सराव करा

उकार  :-




मोडी लिपी मुळाक्षर


'सु' हे मोडी अक्षर वेगळ्या पद्धतीने लिहिले जाते . बालबोध / देवनागरी 'य' हे अक्षर  अर्ध लिहून त्याला पुढे तु हे मोडी अक्षर जोडले जाते . 

मागील पाठांत आपण शिकलो की ' तू ' हे मोडी अक्षर जोडून मोडी लिपीतिल बरीच अक्षरे लिहिली जातात . त्याप्रमाणेच इथेही यु, झु, थु , लु , चु या मोडी मुळ अक्षरांना मोडी तु हे अक्षर जोडून उकार लिहिले जातात .

'मु' आणि 'पु' यांचे उकार बालबोध / देवनागरी प्रमाणेच आहेत . 
'
फु' हे मोडी अक्षर तु मोडी अक्षर जोडूनच पण  स्वतंत्र पद्धतीने लिहिले जाते. फ या मोडी अक्षराला तु हे मोडी अक्षर जोडलेले आहे . पण ते कशाप्रकारे जोडलेले आहे त्याचे नीट निरीक्षण करा व लिहिण्याचा सराव करा . 

'कु' हे मोडी अक्षर स्वतंत्र प्रकारेच लिहिले आहे . परंतु कु ची सुरुवातच मोडी तु अक्षरा ने होते . नीट निरीक्षण करून पुन्हा पुन्हा लिहिण्याचा सराव करा.


एकार :-


मोडी मुळ अकारांती अक्षरांवर एक मात्रा देऊन एकार लिहिले जातात .



मोडी लिपी मुळाक्षर



ऐकार :-


मोडी मुळ अक्षरांवर मात्रा देऊन ५ चा आकडा लिहून ऐकार लिहिले जातात.


मोडी लिपि मुळाक्षर


ओकार :-



मोडी आकारांती अक्षरांवर एक मात्रा देऊन ओकार लिहिले जातात.


मोडी लिपी मुळाक्षर

औकार :-


मोडी आकारांती अक्षरांवर ५ चा आकडा मात्रे प्रमाणे देऊन औकार लिहितात.


मोडी लिपी मुळाक्षर


अनुस्वार :-


मोडी अकारांती मुळ अक्षरांवर टिंब देऊन अनुस्वार लिहिले जातात.

मोडी लिपी मुळाक्षर 


विसर्ग :-


मोडी मुळाक्षरा पुढे दोन टिंब देऊन विसर्ग लिहितात . 

मोडी लिपी मुळाक्षर

वर शिकलेल्या अक्षरांच्या बाराखड्या :-

मोडी लिपी मुळाक्षर

वाचा,  लिहा आणि सराव करा  :-

मोडी लिपी शब्द

विशेष लक्षात ठेवण्यासारखी अक्षरे :-

मोडी लिपी अक्षरे

गृहपाठ :-

आतापर्यंत शिकलेल्या अक्षरांच्या बरखड्या ५ वेळा लिहा .
तसेच बरखाड्यांवर आधारित अक्षरांवर १० शब्द  आणि १० वाक्य लिहा .


टीप :-

मोडी अक्षर लेखनात बर्‍याच अंशी साम्य असल्यामुळे मोडी "क" आणि "ला" हा भेद संदर्भानेच ओळखावा लागतो.
तसेच मोडी लिपीत विराम चिन्हे , शब्द फोड किंवा शब्द तोड हे नियम नसल्यामुळे  जिथ पर्यन्त ओळ आहे तिथ पर्यन्त लिहीत जाण्याच्या पद्धतीमुळे शब्द किंवा वाक्याची तोड अथवा वेगळे कुठे करावे हे संदर्भ पाहून लिप्यंतर करणे आवश्यक असते . नाहीतर वाक्य अथवा शब्द चुकीचे वाचले जाऊ शकते . 

मोडी वाचताना वाचकाला संदर्भाने व तरतम्याने वाचावे लागते . 



मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ २ शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा  :-

https://modeelipi.blogspot.com/2019/04/modi-lipi-mulakshara-basic-alphabets-lesson2-barakhadi.html

3 comments:

  1. मोडी सारख्या किचकट लिपीचे अतिशय सोप्या पद्धतीने आकलन करता आले. धन्यवाद ��

    ReplyDelete
  2. धन्यवाद🙏🏽... मोडी लिपीत(श्री, ञ,) हे अक्षर कसे लिहावे?

    ReplyDelete