Showing posts with label Modi Lipi. Show all posts
Showing posts with label Modi Lipi. Show all posts

Monday, June 10, 2019

मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ ५




मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ ५


आता पर्यन्त आपण ३५ अक्षरे शिकलो त्यांत काही स्वर व व्यंजने देखील शिकलो . 

आजच्या पाठात आपण " उ " शिकणार आहोत आणि  " अ " या स्वरापासून लिहिली जाणारी अक्षर शिकणार आहोत.

"अ" आणि "आ" ही देवनागरीत सारखी दिसणारी अक्षरे मोडी लिपी मध्ये मात्र पुर्णपणे स्वतंत्र पद्धतीने, वळणांनी लिहिलेली सापडतात. 

"आ " हे अक्षर मोडी लिपीतील व या व्यंजनाचा वापर करून लिहायचा कसा हे आपण शिकलो .

" अ " हे अक्षर मोडी लिपीत लिहिताना देवनागरी मध्ये जसा अ लिहितात तसाच अर्धा  अ लिहून ,  हात न उचलता शिरोरेघेवरून लिहायला सुरुवात करून , खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे लिहून. 

मोडी लिपी मुळाक्षर
 त्यालाच चिकटून मोडी र हे व्यंजन जोडल्यास मोडी अ हे स्वराक्षर तयार होते .खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे लिहून.

मोडी लिपी मुळाक्षर




पुढील चित्रात दाखवल्याप्रमाणे मोडी अ हे स्वराक्षर तयार होते .  हा मोडी देवनागरी च्या आकड्या प्रमाणे सुद्धा दिसतो.



एकार


याच मोडी लिपीतील अ या अक्षरावर एक मात्रा दिल्यास , देवनागरीतले " ए " हे स्वराक्षर तयार होते.पुढील चित्रात दाखवल्याप्रमाणे 



ऐकार


याच मोडी लिपीतील अ या अक्षरावर ५ चा आकडा मात्रा दिल्यास , देवनागरीतलेहे अक्षर तयार होते.
खालील चित्रात दाखवले आहे त्याप्रमाणे


आणि ही देवनागरी मध्ये लिहिली जाणारी अक्षरे मोडी लिपी मध्ये नाहीत . अ याच स्वरा वर एक व दोन मात्रा देऊन लिहिली जातात.




अ या मोडी लिपी अक्षरावर अनुस्वार दिल्यावर अं हे अक्षर तयार होते . 



आणि याच मोडी अ या अक्षरापुढे २ टिंब दिल्यास , विसर्ग लावल्यास अः हे अक्षर तयार होते 




मोडी लिपीत हे अक्षर खालील प्रकारे लिहिलेले देखील सापडतात. 








"उ" हे स्वराक्षर अतिशय सोपे आहे . त्याच्या वळणाचे नीट निरीक्षण करा व पुन्हा पुन्हा लिहायचा सराव करा. उ हे स्वराक्षर संस्कार भारती रांगोळीतील एका चिन्हा प्रमाणेच लिहिले जाते. 




गृहपाठ

आज शिकलेल्या अक्षरांचा पुन्हा पुन्हा लिहिण्याचा सराव करा . मोडी लिपीत अ चे दोन वेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत त्या दोघांचा वारंवार लिहिण्याचा सराव करा .



Friday, June 7, 2019

मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ ४


मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ ४

आतापर्यंत आपण ३० अक्षरे शिकलो  आजच्या पाठात आपण केवळ २ अक्षरांवरून तयार होणारी ५ अक्षरे शिकणार आहोत.




मोडी लिपी मुळाक्षर


मोडी  लिपीतिल एका "व" या अक्षरावरून आपण ५ अक्षरे लिहायला शिकणार आहोत

मोडी 'व' हे अक्षर लिहिण्यास अतिशय सोपे आहे . वळणाचे नीट निरीक्षण करा व सराव करा.

व या मोडी अक्षराला डाव्या बाजूस मध्यावर  गाठ दिली  की मोडी लिपीतिल "ब" हे अक्षर तयार होते .

मोडी व या अक्षराला डाव्या बाजूला शिरोरेघे जवळ एक पोकळ गाठ दिली की  मोडी चे "आ" हे अक्षर तयार होते .

व या मोडी अक्षरापासून तयार झालेल्या आ या अक्षरावर एक मात्रा दिल्यास "ओ" आणि दोन मात्रा दिल्यावर "औ"  ही अक्षरे तयार होतात.

 व आणि ब ही अक्षरे व्यंजने आहेत. तर आ, ओ, औ हे स्वर आहेत.


आकार :-



मोडी व आणि ब यांचे काने त्यांना जोडूनच आहेत . त्यांच्या वळनांचे नीट निरीक्षण करा व सराव करा. 


मोडी लिपी मुळाक्षर

मोडी लिपी मुळाक्षर


इकार :-

मागील पाठांत शिकल्याप्रमाणेच मोडी मुळ अक्षरांनाच वेलांटी जोडून -हस्व व दीर्घ  इकार काढले जातात.

मोडी लिपी मुळाक्षर


उकार  :-

मुळ मोडी अक्षरांनाच मोडी लिपीतिल तू हे अक्षर जोडून -हस्व व दीर्घ उकार काढले जातात.
मोडी लिपी मुळाक्षर
मोडी लिपी मुळाक्षर

एकार :-

मुळ मोडी लिपी अक्षरांवर देवनागरी प्रमाणेच डोक्यावर एक मात्रा देऊन एकार लिहिले जातात.
मोडी लिपी मुळाक्षर

मोडी लिपी मुळाक्षर



ऐकार :-


मुळ मोडी  अकारांती अक्षरांवर ५ चा आकडा काढून ऐकार लिहिले जातात.
मोडी लिपी मुळाक्षर



मोडी लिपी मुळाक्षर



ओकर :-


आकारांती मोडी अक्षरावर देवनागरी एक मात्रा देऊन ओकर लिहिले जातात.

मोडी लिपी मुळाक्षर


मोडी लिपी मुळाक्षर



औकार :-


आकारांती मोडी अक्षरांवर ५ चा आकडा देऊन औकार लिहिले जातात.
मोडी लिपी मुळाक्षर


मोडी लिपी मुळाक्षर


अनुस्वार :-


मुळ मोडी अक्षरांवर टिंब देऊन अनुस्वार लिहिले जातात, देवनागरी प्रमाणेच.

मोडी लिपी मुळाक्षर

मोडी लिपी मुळाक्षर


विसर्ग :-


मुळ मोडी अक्षरांपुढे  देवनागरी प्रमाणेच दोन टिंब देऊन विसर्ग देतात. 

मोडी लिपी मुळाक्षर

मोडी लिपी मुळाक्षर



वर शिकलेल्या अक्षरांच्या बारखड्या

मोडी लिपी बाराखडी

गृहपाठ :-

आज शिकलेल्या व आधीच्या पाठांत शिकलेल्या सर्व बरखड्या ५ वेळा लिहा . व आज शिकलेली अक्षरे वापरुन शब्द व वाक्य बनवा.  

Thursday, June 6, 2019

मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ ३


मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ ३



मागील २ पाठांत आपण एकूण २०  मोडी अक्षरे शिकलो.आज आणखी १० अक्षरांची माहिती करून घेऊ .आज आपण परस्परविरोधी किंवा थोड्या फार फरकाने बदलणारी अक्षरे पाहूया.

आज आपण पुढील १० अक्षरे पाहूया : -




मोडी लिपी मुळाक्षर


मोडी 'स' हे अक्षर ७ या अंकासारखे आहे .

तर 'य' हे अक्षर अगदी ७ च्या विरुद्ध आहे .

'म' हे अक्षर बालबोध   अक्षरासारखेच आहे . पण त्याचा काना देताना लिखणी वर न उचलता गाठ मारल्यासारखा लिहिला जातो .

मोडी लिपीतील 'फ' हे अक्षर प्रथम बालबोध प लिहून त्याला मोडी काना जोडून लिहिला जातो.

'झ' हे अक्षर बालबोध प्रमाणेच आहे .फक्त लेखणी न उचलता काना काढला आहे .

'प' हे अक्षर गणपतीच्या गंधासारखे आहे .

मोडी प या अक्षराला डाव्या बाजूला पोकळ गाठ दिली की मोडी 'थ' हे अक्षर तयार होते.

थोडया फार फरकाने  बदलणार्‍या अक्षरांपैकी 'क' हे अक्षर आहे  . अर्धवट मोडी लिपीतील ल हे अक्षर काढून त्याची उजवी बाजू वर शिरोरेघेला न चिकटवता उजव्या बाजूस खाली ओढली जाते . व तिथेच एक पुन्हा गाठ देऊन ती रेघ / काना वर शिरोरेघेला जोडले जाते .

टीप : - क च्या दोन्ही गाठी पोकळ किंवा भरीव काढल्या तरी चालतात.

आपल्या मराठीतला ४ चा अंक म्हणजेच मोडी लिपीतील 'ल' हे अक्षर होय .

'च' हे अक्षर मोडी लिपीतील दस्तऐवज वाचताना वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेले सापडले आहेत . त्यांच्या वळणांचे नीट निरीक्षण करून त्या प्रमाणे लिहिण्याचा सराव करा .

आकार :-


मोडी लिपी मुळाक्षर


'सा' हे अक्षर इंग्रजी अक्षर U सारखे लिहून त्यालाच लेखणी न उचलता काना काढला जातो व त्याच्या पोटात एक तिरपी रेघ ओढतात.  याचे नीट निरीक्षण करून परत परत सराव करा .

'या' हे अक्षर मोडी लिपीतिल म अक्षर अर्धे लिहून त्यालाच आणखी एक काना जोडला जातो .

'मा' या अक्षराचे नीट निरीक्षण करा. त्याच्या वळणावर लक्ष द्या . कारण दिसायला जरी सोपा दिसत असला तरी त्याचे लिहिताना थोडे जरी वळण चुकले तरी वाचणार्‍याला या अक्षरा संबंधित शब्द वाचणे कठीण जाते . वळण चुकल्यास तो मोडी अक्षर क आणि ला सारखा दिसू  शकतो .

'फा' हे अक्षर फ प्रमाणेच लिहिले जाते . फक्त त्यात आणखी एक काना लिहिला जातो . त्याचे नीट निरीक्षण करून लिहा .

'झा' हे अक्षर झ या मोडी लिपीतिल अक्षराप्रमाणेच आहे . त्याचे नीट निरीक्षण करून लिहा .

'पा' हे मोडी अक्षर देवनागरी लिपीतिल पा प्रमाणेच लिहिले जाते .

'था' हे मोडी अक्षर देवनागरीतिल था अक्षराप्रमाणेच लिहिले जाते .

'का' हे अक्षर मोडी लिपीतिल क सारखाच  लिहितात. फक्त त्यात आणखी एक काना जोडला जातो .

'ला' हे मोडी अक्षर दिसायला मोडी लिपीतिल क या अक्षराप्रमाणेच असते . परंतु क लिहितान त्याच्या दोन्ही गाठी पोकळ किंवा दोन्ही गाठी भरीव लिहितात .   पण ला ची पहिली गाठ पोकळ व दुसरी गाठ भरीवच दिली  पाहिजे .
'चा' या अक्षराचा काना स्वतंत्र आहे . मुळ मोडी च या अक्षराला काना जोडला आहे .


 इकार :-


मोडी लिपी मुळाक्षर

ली हे मोडी अक्षर वगळता बाकी सर्व अक्षरे मुळ मोडी अकारांती अक्षरांवर  वेलांटी काढून लिहितात. 


मोडी लिपी मुळाक्षर


काही दस्तैवजांमध्ये मुळ मोडी लिपी ल याच अक्षरावर वेलांटी दिलेली सुद्धा आढळते . खलील चित्रात दखवल्याप्रमाणे :-


बर्‍याचदा मुळ देवनागरी लिपीतिल ल याच अक्षरावर वेलांटी -ली असे लिहलेले देखील सापडले आहे .खलील चित्रात दखवल्याप्रमाणे :-

मोडी लिपी मुळाक्षर

वरील वळणांचे नीट निरीक्षण करा व सराव करा

उकार  :-




मोडी लिपी मुळाक्षर


'सु' हे मोडी अक्षर वेगळ्या पद्धतीने लिहिले जाते . बालबोध / देवनागरी 'य' हे अक्षर  अर्ध लिहून त्याला पुढे तु हे मोडी अक्षर जोडले जाते . 

मागील पाठांत आपण शिकलो की ' तू ' हे मोडी अक्षर जोडून मोडी लिपीतिल बरीच अक्षरे लिहिली जातात . त्याप्रमाणेच इथेही यु, झु, थु , लु , चु या मोडी मुळ अक्षरांना मोडी तु हे अक्षर जोडून उकार लिहिले जातात .

'मु' आणि 'पु' यांचे उकार बालबोध / देवनागरी प्रमाणेच आहेत . 
'
फु' हे मोडी अक्षर तु मोडी अक्षर जोडूनच पण  स्वतंत्र पद्धतीने लिहिले जाते. फ या मोडी अक्षराला तु हे मोडी अक्षर जोडलेले आहे . पण ते कशाप्रकारे जोडलेले आहे त्याचे नीट निरीक्षण करा व लिहिण्याचा सराव करा . 

'कु' हे मोडी अक्षर स्वतंत्र प्रकारेच लिहिले आहे . परंतु कु ची सुरुवातच मोडी तु अक्षरा ने होते . नीट निरीक्षण करून पुन्हा पुन्हा लिहिण्याचा सराव करा.


एकार :-


मोडी मुळ अकारांती अक्षरांवर एक मात्रा देऊन एकार लिहिले जातात .



मोडी लिपी मुळाक्षर



ऐकार :-


मोडी मुळ अक्षरांवर मात्रा देऊन ५ चा आकडा लिहून ऐकार लिहिले जातात.


मोडी लिपि मुळाक्षर


ओकार :-



मोडी आकारांती अक्षरांवर एक मात्रा देऊन ओकार लिहिले जातात.


मोडी लिपी मुळाक्षर

औकार :-


मोडी आकारांती अक्षरांवर ५ चा आकडा मात्रे प्रमाणे देऊन औकार लिहितात.


मोडी लिपी मुळाक्षर


अनुस्वार :-


मोडी अकारांती मुळ अक्षरांवर टिंब देऊन अनुस्वार लिहिले जातात.

मोडी लिपी मुळाक्षर 


विसर्ग :-


मोडी मुळाक्षरा पुढे दोन टिंब देऊन विसर्ग लिहितात . 

मोडी लिपी मुळाक्षर

वर शिकलेल्या अक्षरांच्या बाराखड्या :-

मोडी लिपी मुळाक्षर

वाचा,  लिहा आणि सराव करा  :-

मोडी लिपी शब्द

विशेष लक्षात ठेवण्यासारखी अक्षरे :-

मोडी लिपी अक्षरे

गृहपाठ :-

आतापर्यंत शिकलेल्या अक्षरांच्या बरखड्या ५ वेळा लिहा .
तसेच बरखाड्यांवर आधारित अक्षरांवर १० शब्द  आणि १० वाक्य लिहा .


टीप :-

मोडी अक्षर लेखनात बर्‍याच अंशी साम्य असल्यामुळे मोडी "क" आणि "ला" हा भेद संदर्भानेच ओळखावा लागतो.
तसेच मोडी लिपीत विराम चिन्हे , शब्द फोड किंवा शब्द तोड हे नियम नसल्यामुळे  जिथ पर्यन्त ओळ आहे तिथ पर्यन्त लिहीत जाण्याच्या पद्धतीमुळे शब्द किंवा वाक्याची तोड अथवा वेगळे कुठे करावे हे संदर्भ पाहून लिप्यंतर करणे आवश्यक असते . नाहीतर वाक्य अथवा शब्द चुकीचे वाचले जाऊ शकते . 

मोडी वाचताना वाचकाला संदर्भाने व तरतम्याने वाचावे लागते . 



मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ २ शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा  :-

https://modeelipi.blogspot.com/2019/04/modi-lipi-mulakshara-basic-alphabets-lesson2-barakhadi.html

Sunday, February 10, 2019

मोडी लिपी मुळाक्षर बाराखडी प्राथमिक अभ्यास पाठ १



मोडी लिपी मुळाक्षर बाराखडी  प्राथमिक अभ्यास पाठ १ 



आजच्या लेखापासून आपण मोडी लिपी मुळाक्षरांपासून शिकायला सुरुवात करणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी काटाक्षाने लक्षात ठेवा : -

१)  मोडी अक्षरे लिहायला सुरुवात करण्यापूर्वी पानाच्या रुंदी एवढी ओळ आखून घ्यावी. आपण आखीव वहीवर अगर कागदावर लिहीत असलो तरी आपण ज्या शाईने लिहिणार आहोत, त्या शाईने त्या ओळीवरुन पुन्हा ओळ आखावी . यालाच अक्षरावर "शिरोरेघ" देणे असे म्हणतात .

२) मोडी लिपीतील सर्व ईकार दीर्घ असतात . ईकार जरी दीर्घ असले तरी बाराखडीचा सराव करण्यासाठी ते ई कार दोन्ही वेळा दीर्घच लिहावेत .

३) मोडी लिपीतील सर्व उकार -हस्व असतात . तेही वरीलप्रमाणे बाराखडीत लिहिताना दोन वेळा लिहावेत.


मोडी लिपीतील काही अक्षरे अगदी बालबोध लिपीप्रमाणे आहेत . आज आपण बालबोध लिपीप्रमाणे अससलेल्या दहा अक्षरांचा अभ्यास करणार आहोत . या दहा अक्षरातील पाच अक्षरात थोडा फरक आहे. आज आपण अश्या अक्षरांचा अभ्यास करू.

पहिली दहा अक्षरे :-

Modi script,Images for modi lipi mulakshare
मोडी लिपी मुळाक्षर


वरील अक्षरांतील " ग , घ, भ,ष, छ, ळ " या अक्षरांत फरक दिसत नाही.

"छ" किंवा "ळ" काढताना बालबोध प्रमाणे न थांबता एकदम काढा.

मोडी अक्षरे काढताना शक्यतो लेखणी कमीत कमी वेळा उचलायची असते. म्हणून "भ " काढताना मोडी लिपीत तो लेखणी न उचलता काढा .

"त" ची सुरुवात अगदी शिरोरेघ पासून करावी आणि त्याचा डावी कडील भाग थोडा बाकदार काढा.

" ण " च्या उजव्या बाजूला एक गाठ काढून ण काढतात .

"श " च्या वरील भागा एवढाच खालील भाग उजव्या बाजूला वळलेला असतो.

" ड " लिहिताना जसा आपण बालबोध मध्ये घाईत लिहिताना लिहितो तसाच लिहितात . ड ची सुरुवात बालबोध मध्ये एक उभी रेघ देऊन करतात ती उभी रेघ न देता लिहावा .


आकार :-


मूळ मोडी  अक्षराला काना देऊन आकार काढतात.

मोडी लिपीत भा दोन प्रकारे लिहिला जातो . खलील चित्रात दाखवलेला आहे .


Modi script,Images for modi lipi mulakshare
मोडी लिपी मुळाक्षर 


इकार:-

Modi script,Images for modi lipi mulakshare
मोडी लिपी मुळाक्षर


इकार काढताना मूळ मोडी  अक्षराला वर दाखवल्याप्रमाणे वेलांटी जोडून इकार काढतात .

ड चा इकार दोन प्रकारे लिहिलेला सापडतो . खालील चित्रात दाखवला आहे तो पहा . 

ज्या अक्षरांना काना आहे अश्या अक्षरांना अर्धवट वेलांटी देतात . व काना नसलेल्यांना " ड,छ , ळ " यांना पूर्ण वेलांटी देतात . 

-हस्व व दीर्घ इकार दोन्ही एकाच पद्धतीने मोडी लिपीत लिहीले जातात. 


उकार:-


Modi script,Images for modi lipi mulakshare
मोडी लिपी मुळाक्षर 



वरील सर्व उकार बालबोध प्रमाणेच आहेत .फक्त " तु " हे अक्षर यात वेगळे काढले जाते . मोडी लिपीतील "तु" हा उकार फार महत्वाचा आहे.  पुढे येणार्‍या बर्‍याच अक्षरांचा उकार काढताना त्याला हा " तु " जोडला जातो . 

तसेच " ग " चा उकार देखील कोठे कोठे वरील चित्रात दाखवल्या प्रमाणे दिलेला सापडतो .


एकार:-


एकराची मात्रा बालबोध प्रमाणेच आहे .


Modi script,Images for modi lipi mulakshare
मोडी लिपी मुळाक्षर 


ऐकार:-


तर ऐकाराची मात्रा बालबोध प्रमाणे अक्षरावर दोन मात्रा न देता च्या अंकाप्रमाणे अक्षरावर काढतात . 

Modi script,Images for modi lipi mulakshare
मोडी लिपी मुळाक्षर 


ओकार:-


ओकाराची मात्रा बालबोध प्रमाणेच आहे .

Modi script,Images for modi lipi mulakshare
मोडी लिपी मुळाक्षर 

औकार:-


 तर औकाराची मात्रा बालबोध प्रमाणे अक्षरावर दोन मात्रा न देता  च्या अंकाप्रमाणे अक्षरावर काढतात .

Modi script,Images for modi lipi mulakshare
मोडी लिपी मुळाक्षर 


अनुस्वार :-


बालबोध प्रमाणेच मोडी अक्षरांवर अनुस्वार देतात .


Modi script,Images for modi lipi mulakshare
मोडी लिपी मुळाक्षर 




विसर्ग:-

बालबोध प्रमाणेच मोडी मुळाक्षराला विसर्ग लावतात.


Modi script,Images for modi lipi mulakshare
मोडी लिपी मुळाक्षर 



वर शिकलेल्या अक्षरांच्या बाराखड्या खालीलप्रमाणे आहेत :-


यांचा सराव पुन्हा पुन्हा लिहून करा म्हणजे लिपी लक्षात राहण्यास सोपी जाईल . जितका सराव लिहिण्याचा कराल तितके अक्षर सुधारण्यास मदत मिळेल व मोडी दस्त ऐवज वाचण्यास सोपे जाईल .

Modi script,Images for modi lipi mulakshare
मोडी लिपी मुळाक्षर बाराखडी 



 खालील शब्दांचा सराव करा वाचण्याचा व परत मोडी लिपीत लिहा :-






विशेष लक्षात ठेवण्यासारखी अक्षरे:-




गृहपाठ :-


आज शिकलेल्या दहा अक्षरांचा व त्यांच्या बाराखड्यांशी संबंधित दहा शब्द व पाच वाक्य तयार करा .

लिपी कशी लिहावी तत्संबंधी चित्रफीत (video) मी लवकरच link upload  करेन. जरूर  बघा व आणखी चांगला सराव करा



मोडी लिपी मुळाक्षर बाराखडी  प्राथमिक अभ्यास पाठ २ शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:-


https://modeelipi.blogspot.com/2019/04/modi-lipi-mulakshara-basic-alphabets-lesson2-barakhadi.html

खालील YouTube link  पहा