मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ ४
आतापर्यंत आपण ३० अक्षरे शिकलो आजच्या पाठात आपण केवळ २ अक्षरांवरून तयार होणारी ५ अक्षरे शिकणार आहोत.
|
मोडी लिपी मुळाक्षर |
मोडी लिपीतिल एका
"व" या अक्षरावरून आपण ५ अक्षरे लिहायला शिकणार आहोत
मोडी
'व' हे अक्षर लिहिण्यास अतिशय सोपे आहे . वळणाचे नीट निरीक्षण करा व सराव करा.
व या मोडी अक्षराला डाव्या बाजूस मध्यावर गाठ दिली की मोडी लिपीतिल
"ब" हे अक्षर तयार होते .
मोडी व या अक्षराला डाव्या बाजूला शिरोरेघे जवळ एक पोकळ गाठ दिली की मोडी चे
"आ" हे अक्षर तयार होते .
व या मोडी अक्षरापासून तयार झालेल्या आ या अक्षरावर एक मात्रा दिल्यास
"ओ" आणि दोन मात्रा दिल्यावर
"औ" ही अक्षरे तयार होतात.
व आणि ब ही अक्षरे व्यंजने आहेत. तर आ, ओ, औ हे स्वर आहेत.
आकार :-
मोडी व आणि ब यांचे काने त्यांना जोडूनच आहेत . त्यांच्या वळनांचे नीट निरीक्षण करा व सराव करा.
|
मोडी लिपी मुळाक्षर |
|
मोडी लिपी मुळाक्षर |
इकार :-
मागील पाठांत शिकल्याप्रमाणेच मोडी मुळ अक्षरांनाच वेलांटी जोडून -हस्व व दीर्घ इकार काढले जातात.
|
मोडी लिपी मुळाक्षर |
उकार :-
मुळ मोडी अक्षरांनाच मोडी लिपीतिल तू हे अक्षर जोडून -हस्व व दीर्घ उकार काढले जातात.
|
मोडी लिपी मुळाक्षर |
|
मोडी लिपी मुळाक्षर |
एकार :-
मुळ मोडी लिपी अक्षरांवर देवनागरी प्रमाणेच डोक्यावर एक मात्रा देऊन एकार लिहिले जातात.
|
मोडी लिपी मुळाक्षर
|
|
मोडी लिपी मुळाक्षर
|
ऐकार :-
मुळ मोडी अकारांती अक्षरांवर ५ चा आकडा काढून ऐकार लिहिले जातात.
|
मोडी लिपी मुळाक्षर
|
|
मोडी लिपी मुळाक्षर
|
ओकर :-
आकारांती मोडी अक्षरावर देवनागरी एक मात्रा देऊन ओकर लिहिले जातात.
|
मोडी लिपी मुळाक्षर
|
|
मोडी लिपी मुळाक्षर
|
औकार :-
आकारांती मोडी अक्षरांवर ५ चा आकडा देऊन औकार लिहिले जातात.
|
मोडी लिपी मुळाक्षर
|
|
मोडी लिपी मुळाक्षर
|
अनुस्वार :-
मुळ मोडी अक्षरांवर टिंब देऊन अनुस्वार लिहिले जातात, देवनागरी प्रमाणेच.
|
मोडी लिपी मुळाक्षर
|
|
मोडी लिपी मुळाक्षर
|
विसर्ग :-
मुळ मोडी अक्षरांपुढे देवनागरी प्रमाणेच दोन टिंब देऊन विसर्ग देतात.
|
मोडी लिपी मुळाक्षर
|
|
मोडी लिपी मुळाक्षर
|
वर शिकलेल्या अक्षरांच्या बारखड्या
|
मोडी लिपी बाराखडी |
गृहपाठ :-
आज शिकलेल्या व आधीच्या पाठांत शिकलेल्या सर्व बरखड्या ५ वेळा लिहा . व आज शिकलेली अक्षरे वापरुन शब्द व वाक्य बनवा.
No comments:
Post a Comment