Sunday, February 10, 2019

मोडी लिपी मुळाक्षर बाराखडी प्राथमिक अभ्यास पाठ १



मोडी लिपी मुळाक्षर बाराखडी  प्राथमिक अभ्यास पाठ १ 



आजच्या लेखापासून आपण मोडी लिपी मुळाक्षरांपासून शिकायला सुरुवात करणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी काटाक्षाने लक्षात ठेवा : -

१)  मोडी अक्षरे लिहायला सुरुवात करण्यापूर्वी पानाच्या रुंदी एवढी ओळ आखून घ्यावी. आपण आखीव वहीवर अगर कागदावर लिहीत असलो तरी आपण ज्या शाईने लिहिणार आहोत, त्या शाईने त्या ओळीवरुन पुन्हा ओळ आखावी . यालाच अक्षरावर "शिरोरेघ" देणे असे म्हणतात .

२) मोडी लिपीतील सर्व ईकार दीर्घ असतात . ईकार जरी दीर्घ असले तरी बाराखडीचा सराव करण्यासाठी ते ई कार दोन्ही वेळा दीर्घच लिहावेत .

३) मोडी लिपीतील सर्व उकार -हस्व असतात . तेही वरीलप्रमाणे बाराखडीत लिहिताना दोन वेळा लिहावेत.


मोडी लिपीतील काही अक्षरे अगदी बालबोध लिपीप्रमाणे आहेत . आज आपण बालबोध लिपीप्रमाणे अससलेल्या दहा अक्षरांचा अभ्यास करणार आहोत . या दहा अक्षरातील पाच अक्षरात थोडा फरक आहे. आज आपण अश्या अक्षरांचा अभ्यास करू.

पहिली दहा अक्षरे :-

Modi script,Images for modi lipi mulakshare
मोडी लिपी मुळाक्षर


वरील अक्षरांतील " ग , घ, भ,ष, छ, ळ " या अक्षरांत फरक दिसत नाही.

"छ" किंवा "ळ" काढताना बालबोध प्रमाणे न थांबता एकदम काढा.

मोडी अक्षरे काढताना शक्यतो लेखणी कमीत कमी वेळा उचलायची असते. म्हणून "भ " काढताना मोडी लिपीत तो लेखणी न उचलता काढा .

"त" ची सुरुवात अगदी शिरोरेघ पासून करावी आणि त्याचा डावी कडील भाग थोडा बाकदार काढा.

" ण " च्या उजव्या बाजूला एक गाठ काढून ण काढतात .

"श " च्या वरील भागा एवढाच खालील भाग उजव्या बाजूला वळलेला असतो.

" ड " लिहिताना जसा आपण बालबोध मध्ये घाईत लिहिताना लिहितो तसाच लिहितात . ड ची सुरुवात बालबोध मध्ये एक उभी रेघ देऊन करतात ती उभी रेघ न देता लिहावा .


आकार :-


मूळ मोडी  अक्षराला काना देऊन आकार काढतात.

मोडी लिपीत भा दोन प्रकारे लिहिला जातो . खलील चित्रात दाखवलेला आहे .


Modi script,Images for modi lipi mulakshare
मोडी लिपी मुळाक्षर 


इकार:-

Modi script,Images for modi lipi mulakshare
मोडी लिपी मुळाक्षर


इकार काढताना मूळ मोडी  अक्षराला वर दाखवल्याप्रमाणे वेलांटी जोडून इकार काढतात .

ड चा इकार दोन प्रकारे लिहिलेला सापडतो . खालील चित्रात दाखवला आहे तो पहा . 

ज्या अक्षरांना काना आहे अश्या अक्षरांना अर्धवट वेलांटी देतात . व काना नसलेल्यांना " ड,छ , ळ " यांना पूर्ण वेलांटी देतात . 

-हस्व व दीर्घ इकार दोन्ही एकाच पद्धतीने मोडी लिपीत लिहीले जातात. 


उकार:-


Modi script,Images for modi lipi mulakshare
मोडी लिपी मुळाक्षर 



वरील सर्व उकार बालबोध प्रमाणेच आहेत .फक्त " तु " हे अक्षर यात वेगळे काढले जाते . मोडी लिपीतील "तु" हा उकार फार महत्वाचा आहे.  पुढे येणार्‍या बर्‍याच अक्षरांचा उकार काढताना त्याला हा " तु " जोडला जातो . 

तसेच " ग " चा उकार देखील कोठे कोठे वरील चित्रात दाखवल्या प्रमाणे दिलेला सापडतो .


एकार:-


एकराची मात्रा बालबोध प्रमाणेच आहे .


Modi script,Images for modi lipi mulakshare
मोडी लिपी मुळाक्षर 


ऐकार:-


तर ऐकाराची मात्रा बालबोध प्रमाणे अक्षरावर दोन मात्रा न देता च्या अंकाप्रमाणे अक्षरावर काढतात . 

Modi script,Images for modi lipi mulakshare
मोडी लिपी मुळाक्षर 


ओकार:-


ओकाराची मात्रा बालबोध प्रमाणेच आहे .

Modi script,Images for modi lipi mulakshare
मोडी लिपी मुळाक्षर 

औकार:-


 तर औकाराची मात्रा बालबोध प्रमाणे अक्षरावर दोन मात्रा न देता  च्या अंकाप्रमाणे अक्षरावर काढतात .

Modi script,Images for modi lipi mulakshare
मोडी लिपी मुळाक्षर 


अनुस्वार :-


बालबोध प्रमाणेच मोडी अक्षरांवर अनुस्वार देतात .


Modi script,Images for modi lipi mulakshare
मोडी लिपी मुळाक्षर 




विसर्ग:-

बालबोध प्रमाणेच मोडी मुळाक्षराला विसर्ग लावतात.


Modi script,Images for modi lipi mulakshare
मोडी लिपी मुळाक्षर 



वर शिकलेल्या अक्षरांच्या बाराखड्या खालीलप्रमाणे आहेत :-


यांचा सराव पुन्हा पुन्हा लिहून करा म्हणजे लिपी लक्षात राहण्यास सोपी जाईल . जितका सराव लिहिण्याचा कराल तितके अक्षर सुधारण्यास मदत मिळेल व मोडी दस्त ऐवज वाचण्यास सोपे जाईल .

Modi script,Images for modi lipi mulakshare
मोडी लिपी मुळाक्षर बाराखडी 



 खालील शब्दांचा सराव करा वाचण्याचा व परत मोडी लिपीत लिहा :-






विशेष लक्षात ठेवण्यासारखी अक्षरे:-




गृहपाठ :-


आज शिकलेल्या दहा अक्षरांचा व त्यांच्या बाराखड्यांशी संबंधित दहा शब्द व पाच वाक्य तयार करा .

लिपी कशी लिहावी तत्संबंधी चित्रफीत (video) मी लवकरच link upload  करेन. जरूर  बघा व आणखी चांगला सराव करा



मोडी लिपी मुळाक्षर बाराखडी  प्राथमिक अभ्यास पाठ २ शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:-


https://modeelipi.blogspot.com/2019/04/modi-lipi-mulakshara-basic-alphabets-lesson2-barakhadi.html

खालील YouTube link  पहा